सीआरपीएफ जवानाची गोळ्या घालून आत्महत्या

0
15
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गडचिरोली,दि. .१७: केंद्रीय राखीव दलाच्या एका जवानाने गोळ्या घालून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलिस मदत केंद्रात घडली. व्ही.हनुमंत असे मृत जवानाचे नाव असून, तो सीआरपीएफच्या ९ क्रमांकाच्या बटालियनमध्ये कार्यरत होता.
व्ही.हनुमंत याने दुसऱ्या जवानाच्या बंदुकीतून आपल्या छातीवर तीन गोळ्या झाडल्या. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.