पंतप्रधान पीक विमा योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

0
11

धानपिकाला ३९ हजार रु.विमा संरक्षण
गोंदिया,दि.१८- : पंतप्रधान पीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात येत असून या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै २०१७ आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे कर्जदार शेतकèयांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकèयांना ऐच्छीक आहे. खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेस पात्र आहेत. या योजनेअंतर्गत वास्तव दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतक?्यांना वरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकèयांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकासाठी ५ टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत जोखीमस्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.
निश्चित होणारी नुकसान भरपाई ही शासनाने निर्धारित केलेल्या विमा क्षेत्र घटकातून पीक कापणी प्रयोगावरुन उपरोक्त झालेल्या उत्पादनाच्या सरासरी आकडेवारीवर आधारित राहणार आहे. म्हणजेच अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षाचे सरासरी उत्पन्न गुणीले त्या पिकाचा जोखील स्तर निश्चित केले जाणार आहे.
या योजनेअंतर्गत जोखीमची व्याप्ती वाढविण्यात आली असून यामध्ये पीक पेरणी ते पीक काढणी पर्यंतचा कालावधी, नैसर्गीक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबीमुळे पिकातील उत्पन्नात येणारी घट याचा समावेश राहील.अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकातील प्रतिकूल परिस्थितीमुळे अधिसूचित मुख्य पिकांची, अधिसूचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी/लावणी न झालेल्या क्षेत्रासाठी विमा संरक्षण देण्यात येईल. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत उदा.पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी बाबीमुळे शेतकèयांच्या अपेक्षीत उत्पन्नामध्ये उंबरठा उत्पन्नाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षीत असेल तर विमा संरक्षण देण्यात येईल. चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी/काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे नूकसान झाल्यास वैयक्तीक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाईल. पुराचे पाणी शेतात शिरुन पिकाचे झालेले नुकसान भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गीक आपत्तीमुळे होणाèया पिकाच्या नुकसानीस नुकसान भरपाई वैयक्तीक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येणार. हवामानातील प्रतिकूल परिस्थितीत उदा.पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकèयांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये उंबरठा उत्पादनाच्या ५० टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेत तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकèयांना २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्यात येईल.शेतकèयांनी नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहित नमून्यात अर्ज सादर करावा. सातबारा उतारा, आधार कार्ड व बँक पासबुक जोडावी. भात पिकासाठी प्रति हेक्टरी ३९ हजार रुपये विमा संरक्षण देण्यात येईल. शेतकèयांनी पीक विमा हप्ता म्हणून ७८० रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे भरावे. नैसर्गीक आपत्तीमुळे पिकांचे अकस्मात नूकसान झाल्यास ४८ तासाच्या आत त्याबाबत संबंधित विमा कंपनी, संबंधित बँक/महसूल विभाग यांना कळवावे. १८००२७००३२ या रिलायन्स कंपनीच्या टोल फ्री क्रमांवर शेतकèयांनी पिकांचे अकस्मात नुकसान झाल्यास संपर्क साधावा. नुकसान झालेल्या शेतकèयांची नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकèयांनी या योजनेत सहभागी होवून पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी शेतकèयांनी विमा कंपनी, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी व राष्ट्रीयकृत बँकेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांनी केले आहे.