थकबाकीदार शेतकèयांना मिळणार १० हजार रु.कर्ज ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

0
9

गोंदिया,दि.१८ : जिल्ह्यातील जे शेतकरी ३० जून २०१६ रोजी पर्यंत थकबाकीदार आहेत अशा शेतकèयांना खरीप पिकासाठी निविष्ठा खरेदी करण्याच्या दृष्टीने १० हजार रुपयाच्या मर्यादेपर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे. याबाबत शासनाने तातडीने कर्ज देण्याचा निर्णय १४ जून २०१७ च्या शासन निर्णयाद्वारे घेवून तातडीने कर्ज उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले आहे. या शासन निर्णयानुसार ३१ ऑगस्ट २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. १३ जुलै रोजी सहकार मंत्री यांच्याशी जिल्हाधिकारी यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या संवादातून सुध्दा बँकांना निर्देश देण्याबाबत कळविले आहे. जिल्हा अग्रणी व्यवस्थापक यांच्याशी चर्चा होवून आता १० हजार रुपया पर्यंतचे तातडीने कर्ज वाटप करण्यासंदर्भात कोणतीही अडचण नसल्यामुळे कर्ज वाटप करता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तरी जिल्ह्यातील पात्र शेतकèयांना १० हजार रुपये पर्यंतचे कर्ज पाहिजे असल्यास त्यांनी संबंधित राष्ट्रीयकृत बँक, ग्रामीण बँक व गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव यांनी केले आहे.