ट्रक नदीत पलटी होऊन 2 जण ठार

0
9

अकोला,दि.17: जिल्ह्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील काटेपुर्णा नदीत ट्रक पलटी होऊन दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना आज गुरुवारी (दि.17) सकाळी 4 वाजता दरम्यान घडली.विशेष म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताची ही दुसरी घटना आहे.बुधवारी सकाळी 11 वाजता खामगावजवळील टेंभुरना जवळ ट्रकची अँपेला धडक बसून 4 ठार तर 6 जखमी झाले होते. आज पहाटे सुद्धा राष्ट्रीय महामार्गावर अकोल्यापासून 15 किलोमीटर अंतरावरील काटेपुर्णा नदीच्या पुलावरून 2 ट्रकमध्ये अपघात झाला.त्यात ट्रक पुलावरून खाली कोसळले. यामध्ये दोघे जागीच ठार झाले,त्यामध्ये ट्रक चालक व क्लिनरचा समावेश असल्याचे वृत्त आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून पंचनामा करीत आहे.