डुग्गीपारचे ठाणेदार म्हणून पर्वते रुजू

0
11

सडक अर्जुनी,दि.17-तालुक्यातील डुग्गीपार पोलिस ठाण्याचे ठाणेदार म्हणून स्थानिक गु्न्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक किशोर पर्वते हे रुजू झाले आहेत.पर्वते यांची नियुक्ती डुग्गीपारचे ठाणेदार केशव बावळे यांच्याविरुध्द दाखल झालेल्या तक्रारीमुळे करण्यात आली आहे.बावळे यांच्यावर गोंदिया जिल्ह्यात रुजू होण्यापुर्वी आपल्याच विभागातील एका महिला कर्मचारी हिला लग्नाचे आमिष देत अवैध संबध ठेवल्याप्रकरणी केलेल्या तक्रारीवरुन जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांच्याकडे चौकशी सोपविली होती.त्या चौकशीत आपले बयाण नोंदविण्यासाठी सदर महिला ही देवरीला आल्यानंतर डुग्गीपार पोलिस ठाण्यात गेल्यावर तिथे तिला बावळे यांनी मारण्याचा व धमकावण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना लगेच कार्यमुक्त करुन पोलिस मुख्यालयाला जोडण्यात आले.सध्या बावळे हे वैद्यकिय रजेवर गेले आहेत.बावळे यांच्याविरुध कलम 376(2)(एन),307,504,342 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे