दुष्काळी परिस्थितीमुळे गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील ग्रा.प.निवडणुकांना स्थगिती द्या-खासदार प्रफुल पटेल

0
19

गोंदिया,दि.१७(खेमेंद्र कटरे)-गेल्या काही वर्षापासूनचा आढावा घेतल्यास यावर्षिची परिस्थीती भयावह अशी असून गोंदिया-भंडारा जिल्हे हे दुष्काळाच्या छायेत आले आहेत.आधीच दुष्काळी परिस्थिती,त्यातच पिण्याच्या पाण्याची उदभवलेली समस्या आणि कोरडे असलेले धरणे बघून शासनाने त्वरीत या दोन्ही जिल्ह्यांना दुष्काळग्रस्त जाहिर करुन येत्या दिवाळीपुर्वी होऊ घातलेल्या गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांना पुढे ढकलण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ट नेते खासदार प्रफुल पटेल यांनी केली.ते गोंदिया येथील नमाद महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकारपरिषदेत आज(दि.१७)बोलत होते.
पटेल पुढे म्हणाले की गेल्या २०-२५ वर्षात न उदभवलेली परिस्थिती आजच्या घडीली निर्माण झाली असून ऑगस्ट महिन्या अर्धा लोटल्यानंतरही पाहिजे त्याप्रमाणात पाऊस न झाल्याने धानपिकाची रोवणीच होऊ शकली नाही.तर ज्या काही मोजक्या शेतकèयांनी हलक्या धानपिकाची रोवणी पंपाच्या पाण्याने केली ते पिक सुध्दा पाण्याअभावी जगण्याची चिन्हे कमी झाली आहेत.त्यातच कमी पडलेल्या पावसामुळे आजपासूनच जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने जिल्हाप्रशासनाने ज्या गावामधील विहिरी आटल्या त्या गावात तत्काळ टॅँकरने पाणी पुरवठा करावे अशा सुचना आपण जिल्हाधिकाèयांना केल्याचे सांगितले.खा.पटेल म्हणाले की तिरोडा तालुक्यातील मनोरा गावाला आपण भेट दिली असता त्या गावातील सर्वच १४ विहिरी आटल्याने पाण्यासाठी नागरिकांना हेलपाटे खाण्याची वेळ आली असतानाही जिल्हा प्रशासनाने त्या गावात पिण्याच्या पाण्याची सोय केलेली नाही.जे काही पाणी उरले आहे,ते पाणि पिण्यासाठी उपलब्ध करुन दुष्काळी परिस्थीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन करायला हवे असे सांगत सरकार या दोन्ही जिल्ह्याकंडे दुर्लक्ष करीत असल्याची टिका केली.त्यातच अदानी उद्योग समुहाला दिल्या जाणाèया पाण्यावर सुध्दा प्रशासनाने चर्चा करायला हवे कारण पिण्याचे पाणी आधी उपलब्ध होणे गरजेचे आहे.
गोंदिया भंडारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थीतीबाबत मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष नागपुरात बुधवारी भेट घेऊन चर्चा केली.जिल्हे दुष्काळग्रस्त जाहिर करण्याची मागणी सुध्दा केल्याची माहिती दिली.सोबतच कर्जमाफीसाठी ज्यापध्दतीने शेतकèयांना त्रास सहन करावे लागत आहे,त्यात सुटसुटीतपणा आणणे गरजेचे असल्याचे म्हणाले.सरकारची कर्जमाफी ही फसवी कर्जमाफी असल्याचे सांगत १० हजाराची तत्काळ मदत म्हणजे ते नवीन कर्जच असल्याचे सांगत सरकार शेतकèयांची फसवणुक करीत असल्याचे म्हणाले.तर पिकविम्याची पध्दत सुध्दा चुकीची असून कुठल्याही शेतकèयाला याचा लाभ मिळणार नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस या कर्जमाफीबद्दल सरकारने फेरविचार करीत सरसकट कुठलीही अटी शर्ती न ठेवता द्यायला हवे याभूमिकेची असल्याचे खा.पटेल.म्हणाले.