विद्यार्थ्यांनो, मोठी स्वप्न बघा!-खा.पटोले

0
9

भंडारा,दि.19: आपण सर्व शेतकºयांची मुलं आहोत. आपणाला गुणात्मक शिक्षण मिळणार आहे. जिल्ह्यात नवोदय विद्यालयाची ही पहिली ‘बॅच’ आहे. त्यामुळे विद्यालयाची भिस्त आपणावर आहे. त्रुट्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, अपुºया सुविधेत पण पुढ जायचं आहे. भंडाºयाच नाव कमवायचं आहे. विशाल दृष्टीकोन ठेवा आणि मोठी स्वप्न बघा, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
भंडारा येथील नवोदय विद्यालयाला त्यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, तहसिलदार संजय पवार व विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय अंभोरे उपस्थित होते.
यावेळी खासदार पटोले यांनी विद्यार्थ्यांना बोलके केले. यामुळे त्यांच्या आत्मविश्वासात भर पडली. खासदार म्हणाले, आपण या ठिकाणी आलोत त्यामुळे तुम्हाला जिल्ह्याचे नाव मोठ करायचं आहे. तुम्हाला देशभरात जाण्याची संधी मिळणार आहे. मन लावून शिका, ही तपस्या आहे. जिल्ह्यात गुणवत्ता आहे. शिक्षणात अडचणी असल्यास वेळोवेळी त्या सांगा. या निमित्ताने देशातील मुलांशी व शाळांशी तुमची स्पर्धा होणार आहे. गुरुजनांचा आदर करा. ‘घरची नाही तर शिक्षणाची ओढ ठेवा’ असा आस्थापूर्वक सल्लाही खासदारांनी दिला. त्यावर बोलतांना खासदार म्हणाले, मी आयुष्यात देशसेवा करायचे ठरविलं होते. सैन्यात जाण्याचा विचार होता परंतु जाऊ शकलो नाही.
उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. खासदारांनी मुलांच्या राहण्याच्या जागेची, भंडार कक्ष, शयनकक्ष तसेच परिसराची पाहणी केली. भंडारा येथील नवोदय विद्यालय नव्याने सूरु झाले आहे. यात १८ मुलं व १४ मुली असे एकूण ३२ विद्यार्थी ६ व्या वर्गात शिकत आहेत. या विद्यालयाला कोणतीही कमतरता पडू देणार नाही असेही खासदार म्हणाले.