विदर्भ मुस्लिम सेवा संघाची कार्यकारिणी गठीत

0
16

भंडारा,दि.04- ओबीसी सेवा संघ कार्यालय भंडारा येथे डॉ. महेंद्र धावडे, नरेंद्र गंद्रे यांच्या उपस्थितीत व गोपाल सेलोकर यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ मुस्लिम सेवा संघाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. सभेमध्ये मुस्लिम समाजातील प्रतिभावंत व गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी विदर्भ मुस्लिम सेवा संघाची स्थापना करण्यात आली. यामध्ये विदर्भ मुस्लिम सेवा संघाच्या अध्यक्षपदी वहिद शेख यांची बहूमताने निवड करण्यात आली. विदर्भ महासचिव तौसीब खान व सल्लागारपदी डॉ. इलिहाज बेपारी, यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच भंडारा जिल्हा मुस्लिम सेवा संघाची कार्यकारिणी गठत करण्यात आली त्यात अध्यक्ष सय्यद, उपाध्यक्ष शेख तर कोषाध्यक्ष जाबीर शेख, महासिव कमरूद्दीन , उपाध्यक्ष हसनभाई जवाहरनगर आदींची निवड करण्यात आली.