विद्युत तारेच्या स्पर्शाने अस्वलाचा मृत्यू

0
17

बुलढाणा,दि.05- जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात आज एका अस्वलाच झाडाला लागून असलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सातपुड़ाच्या पायथ्याशी टुनकी ते वसाळी रोडवर असलेल्या श्रद्धा आश्रम परिसरात हि घटना घडली. आश्रम समोर एका झाडाला लागूनच विद्युत वाहून नेणारे तार गेले आहेत. या  ताराला अस्वलाचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटने संदर्भात माहिती दिली असून माहिती मिळताच वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.