शिरीष पै आणि निर्भीड पत्रकार गौरी लंकेश यांना श्रद्धांजली

0
22

लाखनी,दि.10-विदर्भ साहित्य संघ, लाखनी, मैफल, युगसंवाद, भंडारा, मानवता सेवा संघ, लाखनी या अंतर्गत आज लाखनी येथील समर्थ विद्यालयातील सभागृहात कवयित्री शिरीष पै आणि निर्भीड पत्रकार गौरी लंकेश यांना श्रद्धांजली  वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा चंदन मोटघरे, प्रमुख वक्ते म्हणून प्रा डॉ अनिल नितनवरे, प्रा नरेश आंबिलकर, कविवर्य प्रमोदकुमार अणेराव असून प्रा बे तू आगाशे, चिंतामण बागडे उपस्थित होते.

लाखनी आणि कवयित्री शिरीष पै यांचे एक वेगळे नाते आहे ते म्हणजे गझलकार प्रल्हाद सोनेवाने यांच्या करुणाघना या गझल पुस्तकाला कवयित्री शिरीष पै यांची प्रस्तावना आहे. डॉ अनिल नितनवरे, प्रा नरेश आंबिलकर आणि कविवर्य प्रमोदकुमार अणेराव यांनी शिरीष पै यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या हायकू या साहित्यप्रकारावर भाष्य करून श्रद्धांजली वाहिली तर गौरी लंकेश यांच्या हत्ये बाबद जाहीर निषेध त्यांनी केला.
भारतात संविधानानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला मिळाला आहे. सरकार कोणतेही असो या परिस्थितीत बदल झालेला आता पर्यंत दिसत नाही. गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध करून शिरीष पै याना आदरांजली वाहून या दोन्ही महान समाजसुधारक आणि जेष्ठ पत्रकार यांच्या जीवनावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा चंदन मोटघरे यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाला प्रल्हाद सोनेवाने, ताराराम हुमे, दा प्रधान, देवानंद नांदेकर, अक्षय मासुरकर, अनिल शेंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अजिंक्य भांडारकर यांनी केले.