गोरेगाव तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी गठीत

0
5
गोरेगाव,दि.10 : स्थानिक तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी नव्याने गठीत करण्यासाठी स्थानिक दुर्गा चौक परिसरातील विजय पाल यांच्या निवासस्थानी  संघाचे निवर्तमान अध्यक्ष रंजित सरोजकर यांच्या अध्यक्षतेत आयोजित बैठकीत सर्वानुमते संघाची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. ज्यामध्ये अध्यक्षपदी हौसलाल रहांगडाले तर सचिव पदावर डिलेश्वर पंधराम यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर उपाध्यक्ष पदावर राजु मेश्राम, कोषाध्यक्ष म्हणून प्रमोद नागनाथे व सहसचिव पदावर नरेंद्र भड यांची निवड करण्यात आली.
निवडणूक प्रक्रियापूर्ण करण्यासाठी निवडनुक निर्णय अधिकारी म्हणून संघाचे जेष्ठ पत्रकार संतोष नागनाथे हे होते. बैठकीच्या सुरुवातीला ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली तर त्यांचा हत्येच्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान कार्यकारीणीमंडळात सल्लागार म्हणून वरिष्ठ पत्रकार संतोष नागनाथे, खेमेंद्र कटरे, अनिल मदनकर, शालीकराम कोल्हे, रंजित सरोजकर यांची निवड करण्यात आली. तर सभासद म्हणून नरेंद्र रामटेके, उत्तम रामटेके, रमेश धमगाये, बुधराम बिजेवार, आदेश फुले, रामकिशन रहमतकर, जयकृष्ण खोब्रागडे, राजू टेंभुर्णीकर, श्यामलाल रहांगडाले, विजय पाल, मनोज सरोजकर आदींचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी बैठकीदरम्यान सर्व पत्रकार बांधवांनी नवनियूक्त पदाधिकाèयांचे अभिनंदन केले.