गोंदिया : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून राहुल रेखावार यांनी शुक्रवारी (दि.१६) पदभार घेतला. सीईओ डी.डी. शिंदे यांची बदली झाल्यानंतर रेखावार आज गोंदियात दाखल झाले. त्यांनी शिंदे यांच्याकडून सूत्रे हाती घेतली.
२0११ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झालेले रेखावार सध्या परीविक्षाधीन कालावधीत नागपूर (शहर) उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.