24.8 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ कायदेशीर बाबींमुळे ‘पतंजली’ रखडला-रामदेव बाबा

कायदेशीर बाबींमुळे ‘पतंजली’ रखडला-रामदेव बाबा

0
26

नागपूर,दि.13 : कायदेशीर बाबी आणि काही विभागांचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्यामुळे मिहानमधील पतंजली प्रकल्पातील उत्पादन वेळेत सुरू होऊ शकले नाही, अशी खंत रामदेव बाबा यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाली असून, पतंजली प्रकल्पात याच महिन्यात हजारो लोक काम करताना दिसतील, अशी घोषणा त्यांनी केली.एक वर्षापूर्वी प्रकल्पाचे भूमिपूजन करताना सहा महिन्यातच प्रकल्प सुरू होईल, अशी घोषणा रामदेव बाबा यांनी व्यासपीठावरून हजारो लोकांसमोर केली होती, हे विशेष. रामदेव बाबा म्हणाले, मी देशविकासासाठी काम करीत आहे. काही प्रश्नांवरून राजकीय लोक विनाकारण मला गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्यांना घाबरणारा नाही. अशांकडे दुर्लक्ष केलेले बरे, असा टोलाही त्यांनी लगावला.