आमदार तोडसाम यांची बदनामी करणाछयावर कारवाई करा

0
12

आदिवासी गोवारी जमात संघटन समन्वय समितीचे जिल्हाधिकाछयांना निवेदन
गोंदिया,दि.२४ : लोकप्रिय आमदार राजुभाऊ तोडसाम यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य करून त्यांच्या तथाकथीत संभाषणाचे टेप सोशल मिडीयावर प्रसारीत करीत त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, यांचा आदिवासी गोवारी जमात निषेध नोंदवित असून त्यांची बदनामी तत्काळ थांबवून दोषींवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन आदिवासी गोवारी जमात संघटन समन्वयक समिती महाराष्ट्राच्या वतीने जिल्हाधिकारीमार्पफ्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले आहे. दोषीवर कारवाई न झाल्यास आदिवासी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, असाही इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजावर होणाछया अन्यायाविरूध्द समाजासाठी लढतांना लोकप्रतिनिधी म्हणून आमदार राजु तोडसाम ागील तीन वर्षांपासून बेधडक मोहिम उघडून लढत आहेत. आदिवासी समाजाच्या नावावर सोयी-सवलतीचा लाभ घेणाछया बोगस आदिवासींना चांगले धारेवर धरले असून त्यांना सळो की पळो करून सोडले आहे. अशात आदिवासी सेवक आमदार राजुभाऊ तोडसाम यांच्या बदनामी करण्याच्या उद्देशाने त्यांचे तथाकथीत संभाषण टेप सोशल मिडियावर प्रसारीत करून बदनामी केली जात आहे. त्यामुळे ही बदनामी आमदाराची नसून संपूर्ण आदिवासी समाजाची आहे. या घटनेचा आदिवासी गोवारी जमात संघटन समन्वयक समिती महाराष्ट्राच्या वतीने निषेध केला जात असून प्रशासनाने तत्काळ यावर आळा घालून बदनामी थांबवावी, अन्यथा आदिवासी समाजाच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यासंबधीचे निवेदन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्यामार्पफ्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे. यावेळी आदिवासी गोवारी जमात संघटन समन्वय समितीचे गुलाब नेवारे, डी.टी.चौधरी, रतिराम राऊत, प्रेमलाल शहारे, प्रविण चौधरी, विजु भोयर, विलास वाघाडे, रविंद्र ठाकरे, रतिराम नेवारे, सुशिल राऊत आदिसह समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.