संगणक परिचालकांच्या संपामुळे ग्रा.प.निवडणुकीवर परिणाम

0
5

गोंदिया,दि.२७-ग्रामविकास विभागातंर्गत ग्रामपंचायत पातळीवर आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात काम करणाèया संगणक परिचालकांना गेल्या फेबुवारी महिन्यापासून मानधन न दिले गेल्याने राज्यातील सर्व संगणक परिचालकांनी २५ सप्टेंबरपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारले आहे.यामुळे ग्रामपंचायत पातळीवर सध्या राज्यात सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करतांना चांगलीच तारांबळ उडत आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करणे होते.त्यामध्ये सहकार्य केल्यानंतर आता मात्र आधी आमचे मानधन नंतरच काम अशी भूमिका घेतल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गावपातळीवर जे ग्रामपंचायत मध्ये संगणक परिचालक कार्यरत होते.त्यांनी संपाचे हत्यार उपसल्याने पाहिजे तो प्रतिसाद ऑनलाईनमध्ये उमेदवारी अर्जाचा दिसून येत नाही.महाऑनलाईन व शासनात झालेल्या करारानुसार नियुक्त करण्यात आलेल्या या संगणक परिचालकांच्या वेतनाचे सुमारे तीन हजार रुपये महाऑनलाईनचे अधिकारी हडप करीत असल्याचा आरोपामुळे त्याचे कामबंद करुन शासनाने आपल्या ताब्यात ही यंत्रणा घेतल्यानंतरही त्यांचे मानधन वेळेवर होत नसल्यानेच राज्यव्यापी काम बंदचा निर्णय घेतल्याचे संघटनेचे राज्य अध्यक्ष सिध्देश्वर मुंडे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात महिन्याच्या एक तारखेला ६ हजार रुपये वेतन देण्यात टास्क कन्फर्मेशनची अट रद्द करुन देण्यात यावे.संग्राम प्रकल्पामध्ये कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषदस्तरावरील सर्व संगणक परिचालकांना सामावून घेण्यात यावे.सीएससी-एसपीव्हीने कपात केलेले मानधन परत मिळावे.नागरिकांना देण्यात येणाèयां प्रत्येक दाखल्यामागे ६० टक्के कमीशन देण्यात यावे.नवीन ई ग्रामसाप्टमध्ये अनेक त्रुट्या असल्याने ते बदलून देण्यात यावे.महाआनलाईनकडील डिसेंबर २०१५ पासूनचे थकीत मानधन देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.