पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी बलिप्रतिप्रदेस राज्यभर आंदोलन

0
21

जळगाव,दि.२६ : कर्जमुक्ती असो की शेतकºयांच्या मालाला हमी भावाचा प्रश्न असो, यात राज्य व केंद्र सरकारने शेतकºयांची फसवणूक केली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. यात सरकारच गुन्हेगार असल्याने बलिप्रतिपदेला (२० आॅक्टोबर रोजी) सरकारविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यभरात पोलीस ठाण्यांवर शेतकरी मोर्चे काढण्यात येऊन सरकारला बळीपूत्रच गाडणार असा निर्धार जळगावात करण्यात आला.
नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणावर मंगळवारी दुपारी राज्यस्तरीय शेतकरी संपूर्ण कर्जमुक्ती व हमीभाव परिषद झाली. यावेळी व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, डॉ. बाबा आढाव, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, सुकाणू समितीचे समन्वयक अजित नवले, सत्यशोधक संघटनेचे किशोर ढमाले, सुकाणू समिती सदस्या सुशिला मोराणे, अशोक ढवळे, नामदेव गावडे, प्रतिभा शिंदे, एस.बी. पाटील आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील होते. ढोल, मृदुंग व टाळ हे पारंपारिक वाद्य मान्यवरांच्याहस्ते वाजवून परिषदेला सुरुवात झाली. प्रास्ताविक प्रतिभा शिंदे यांनी केले. यात त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव यासाठीही यापुढे देखील आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करत बळीराजाला पुढच्या काळात दाद दिली नाही, तर पंढरीची वारी नाही पण जेलची वारी करण्याची तयारी शेतकऱ्यांनी ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच 20 नोव्हेंबरला दिल्लीतील रामलिला मैदानावर देशभरातील शेतकऱ्यांतर्फे पंतप्रधान मोदींनी गुडघे टेकावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात येईल असाही महत्त्वपूर्ण ठराव राज्यव्यापी शेतकरी परिषदेत करण्यात आले.सुकाणू समितीला मुख्यमंत्री देशद्रोही  म्हणतात, मग शेतक:यांबद्दल  रावसाहेब दानवे अपशब्द वापरतात तेव्हा तुम्ही कोठे जातात, असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला.  शेतक:यांबद्दल अपशब्द बोलणा:या भाजपा नेत्यांची यादी मोठी असल्याचे सांगून त्यांनी कापूस पेरला नाही तर तुम्हाला चड्डीही मिळणार नाही, असा इशारा सरकारला दिला.