जिल्हा परिषदेत हमरीतुमरी

0
11

चंद्रपूर : जिल्ह्यातील काही शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविणार्‍या महिला, शाळा समिती आणि मुख्याध्यापकांमध्ये वाद सुरु आहे. हा वाद संपविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणाधिकार्‍यांनी सुनावणी घेतली. मात्र या सुनावणीमध्ये शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आणि मुख्याध्यापकांमध्ये चांगलीच जुंपल्याने मोठे वांदग निर्माण झाले. काही महिला शिक्षक, आहार शिजविणार्‍या महिला तथा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी नारेबाजी केली. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान सुनावनी रद्द करण्यात आली. यानंतर मुख्याध्यपकांनी शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन देत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. तर पोषण आहार कर्मचारी युनियनने पोलीस ठाणे गाठले.
पोषण आहार शिजविणार्‍या महिलांमधील वाद सोडविण्यासाठी सुनावणी घेतली. मात्र शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचे पदाधिकारी आणि काही मुख्याध्यापकांमध्ये बाचाबाची झाली. आता नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
रविकांत देशपांडे,
शिक्षणाधिकारी, चंद्रपूर