रोहयो आयुक्तांनी केली विविध कामांची पाहणी

0
23

गोंदिया,दि.७ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गोंदिया तालुक्यातील कोचेवाही ग्रामपंचायत येथे रोहयो आयुक्त संजय कोलते यांनी विविध कामांची पाहणी केली. यावेळी त्यांचेसमवेत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी प्रविणकुमार बडगे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) आर.टी.शिंदे उपस्थित होते.
या कार्यक्रमांतर्गत ‘एक दिवस मजुरासोबतङ्क हा कार्यक्रम सुध्दा आयोजित करण्यात आला. यावेळी माजी सभापती श्री.भक्तवर्ती, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मजुरांना नरेगा अंतर्गत समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभ, गुरांचा गोठा, अहिल्यादेवी सिंचन विहिर, अमृत कुंड शेततळे, भूसंजीवनी व्हर्मी कंपोस्टींग, भूसंजीवनी नॅडेप कंपोस्टींग, कल्पवृक्ष फळबाग लागवड, निर्मल शौचालय, निर्मल शोषखड्डे, समृध्द गाव तलाव, अंकुर रोपवाटीका, नंदनवन वृक्ष लागवड, समृध्द गाव इत्यादी व सार्वजनिक कामे घेण्याकरीता मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी ग्रामपंचायत मजुरांशी विविध विषयांवर चर्चा करुन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. सोबतच सामाजिक वनीकरण व वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वृक्ष लागवड करतांना फक्त वड प्रजातीचे झाडे तसेच फळझाडांचे लागवड करण्याबाबत मार्गदर्शन केले.