गुरव समाजाची कोजागिरी उत्सहात

0
19
गोरेगाव,दि.७ :तालुक्यातील घोटी येथे गुरव समाज संघाच्या वतीने शरद पौर्णिमा कोजागिरी उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संतोष नागनाथे होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान शंकर यांच्या छायाचित्राचे पुजन करून करण्यात आली. दरम्यान प्रश्न मंजूषा, वादविवाद स्पर्धा, अंताक्षरी, आदी स्पर्धा घेण्यात आल्या.  यावेळी संजय घोले, प्रमोद नागनाथे, सुनील शास्त्री, अविनाश नागनाथे, जोशीराम रहांगडाले, सतेंद्र राऊत, सुरेंद्र बोपचे, सुनिता शास्त्री, माहेश्वरी घोले, संगिता नागनाथे, रेखा दारव्हेकर, प्रेमा नागनाथे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिप्ती शास्त्री, मोना घोले, तब्बू शास्त्री, सोनल माडे, राज दारव्हेकर, पार्थ नागनाथे, तिर्थ घोले, देव नागनाथे, लक्की शास्त्री, पूर्वा नागनाथे, भक्ती नागनाथे, आदींनी सहकार्य केले.