कर्जमाफीसाठी ८२२९५ शेतकऱ्यांचे अर्ज

0
13

गोंदिया,दि.७ : राज्यातील शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने २२ सप्टेबरपर्यंत जिल्ह्यातील ८२,२९५ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहे. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण ७३ हजार ७०७ लाभार्थी थकबाकीदार व नियमीत कर्जदार आहेत. या लाभार्थ्यांचे १ ते ६६ विवरणपत्रात माहिती भरण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर सदर विवरणपत्राची माहिती व ऑनलाईन भरलेले अर्ज यांचे संगणकीय संस्करण होवून त्यानंतर संगणकीकृत पात्र व अपात्र यादया तयार होतील. त्यानंतरच कर्जमाफीसाठी किती शेतकरी पात्र व अपात्र ठरले ही माहिती उपलब्ध होईल. असे जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी कळविले आहे.