पार्किंगसाठी पालिकेची जागा द्या शिख बांधवांची नगराध्यक्षांनी मागणी

0
13

गोंदिया,दि.14- येथील रेलटोली गुरूद्वारा गुरूसिंग सभेच्या शिष्टमंडळाने  नगराध्कयक्ष अशोक इंगळे यांची नगरपालिकेत भेट घेऊन भाविकांचे वाहन उभे करण्याकरिता भविष्यात पार्किंगची समस्या उदभवणार असल्याने परिसरात उपलब्ध नगर पालिकेची जागा पार्किंगकरिता उपलब्ध करून देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.नगराध्यक्ष इंगळे यांनी गुरूद्वारा येथे येणार्या भाविकांना त्रास होवू नये,ङ्माकरिता नगर पालिका प्रशासन प्रयत्नरत राहिल.गुरूद्वारा जवळ नगर पालिकेची जागा पार्किंगकरिता उपलब्ध करून देण्यात ये ईलल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.यावेळी नगर पालिकेचे उपाध्यक्ष शिव शर्मा,नगरसेवक पंकज यादव, बंटी पंचबुद्धे  उपस्थित होते.शिष्टमंडळात सुरविंदर सिंग बल,चंचलसिंग जोहल, कलवंतसिंह जोदल,जसबिरसिंग मिस्त्री,रणदिपसिंह भाटिया,संदीपसिंह जुनेजा,वजिंदर सिंह मान, महिंदर सिंह,दलजितसिंह गुरूदत्ता,अजितसिंग जुनेजा,जसबीरसिंह भाटिय़ा ,पप्पू अरोरा,प्रितपालसिंह होरा आदी उपस्थित होते