अचलपूर तालुक्यात दोन कृषी केंद्रांचे परवाने रद्द

0
6

अमरावती,दि.१४ : – बंदी घालण्यात आलेल्या खते व कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या अचलपूर तालुक्यातील दोन कृषीसेवा केंद्राचे परवाने तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शनिवारी रद्द केले. कीटकनाशाकामुळे शेतकऱ्यांना बाधा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक  कृषी अधिका-यांनी मोहीम राबवून पाच विविध ठिकाणी दीड लाख रुपयांच्या जहाल कीटकनाशकांच्या बंदीचे आदेश दिले.
बंदी घालण्यात आलेल्या कृषीसेवा केंद्रामधील धोतरखेडा येथील वेदांत कृषीसेवा केंद्र व रासेगाव येथील वनवे कृषीसेवा केंद्राचा समावेश आहे. तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्या संयुक्त कारवाईत वेदांत कृषीसेवा केंद्रात अनेक अनियमितता आढळून आल्यात. यावर अमरावती येथील कृषी अधिका-याच्या दालनात सुनावणी झाली. यानंतर या प्रतिष्ठानाचा कीटकनाशक विक्रीचा परवाना रद्द करण्यात आला. याशिवाय वनवे कृषी सेवा केंद्राचा खते विक्रीचा परवाना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आला आहे.