संस्थेच्या विकासासाठी कार्य करा – आल्हाद भांडारकर

0
17
लाखनी,दि.१४ : संस्था अंतर्गत विविध घटक संस्थेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी शाळा आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि उज्वल भवितव्यासाठी संस्कारक्षम शिक्षण द्यावे. घटक संस्थेच्या विकासासाठी कार्य करण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष आल्हाद भांडारकर यांनी केले. संस्थांतर्गत दिवाळी स्नेह मेळाव्याच्या उद्बोधनात आल्हाद भांडारकर ते बोलत होते.
स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी अंतर्गत सर्व घटक संस्थातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी यांचा स्नेह मेळावा आज समर्थ विद्यालय, लाखनी येथे आयोजित करण्यात आला. या स्नेह मेळाव्यात संस्थाध्यक्ष आल्हाद भांडारकर, मधुकर लाड, सौ अर्चना रणदिवे, शिवालाल रहांगडाले, मुख्याध्यापक ताराराम हुमे, संध्या हेमणे, प्रमोद धार्मिक, सुरेश कामथे, रुपेश नागलवाडे, जनार्धन कोल्हारे, अरविंद रामटेके आदी घटक संस्थेतील मुख्याध्यापक उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात शिक्षकांना शाळा आणि समाजासाठी तन, मन, धनाने वाहून जावे असे आवाहन केले. या प्रसंगी शिवालाल रहांगडाले यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्था सदस्य मधुकर लाड यांनी यावेळी मार्गदर्शन केले. घटक संस्थेतील सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळांतील नवीन उपक्रम, विद्यार्थ्यांचे कला गुण याविषयी मनोगतात व्यक्त केले. संस्थेतर्गत स्नेह मेळाव्यास घटक संस्थेतील ३०० शिक्षक कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी किशोर आळे, प्रशांत ढोमणे, गोवर्धन गिऱ्हेपुंजे, यांनी सहकार्य केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन अक्षय मासुरकर व आभार मुख्याध्यापिका संध्या हेमणे यांनी मानले.