अदानी कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलन

0
13

गोंदिया,दि.26 – तिरोडा अदानी पॉवरप्लांट समूहात स्थानिक बेरोजगारांना डावलून बाहेरील राज्यातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देत असल्याने स्थानिक मजुरांनी आज पासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरवात केली आहे. जो पर्यत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यतं काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.
तिरोडा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार हरीश मोरे यांनी दोन महिन्याआधी अदानी पॉवर प्लांट कामगार श्रमिक संघ उभा केला आणि स्थानिक कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी रेटून धरली. या कडे अदानी उद्योग समूहाने दुर्लक्ष केल्याने हरीश मोरे यांनी आज अदानी पॉवरप्लांट मधील कामगारांना हाताशी घेत आज पासून काम बंद आंदोलन पुकारले असले तरी प्लांटचे कामावर परिणाम झालेला नाही.११० च्या जवळपास कामगार आंदोलनात सहभागी झाले होते.प्रकल्प सुरू असून वीज निर्मितीवर परिणाम झालेला नाही.