पुर्व विदर्भातील मध्यवर्तीस्थळ साकोलीत द्या नवे कृषी विद्यापीठ

0
16

गोंदिया,दि.26(खेमेंद्र कटरे) : गेल्या काही वर्षापुर्वी सरकारच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे विभाजन करून पूर्व विदर्भात नवे कृषी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या; पण याबाबतचा शासन निर्णय अजूनही झालेला नाही.विशेष म्हणजे पुर्व विदर्भातील साकोली हे स्थान मध्यवर्ती स्थान असून गोंदिया,गडचिरोली,चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यांनाही जवळचे आहे.राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याने वाहतुकीच्या सर्व सुविधा असलेले हे तालुकास्थळ आहे.जिथे कृषी विभागाचे सुरवातीपासून प्रशिक्षण अभ्यास केंद्र आहे.जवळच मत्स्यजिरे निर्मिती केंद्र सुध्दा असल्याने शासनाने अकाेला कृषी विद्यापीठाचे विभाजन करतांना साकोली या मध्यस्थळाची निवड केल्यास सर्वांना योग्य स्थान मिळू शकते.परंतु चंद्रपूरचे पालकमंत्री व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची एकांगी भूमिका ही फक्त सर्व योजना व कार्यालये चंद्रपूर जिल्ह्यातच सुरु करण्याची असल्याने पुर्व विदर्भातील इतर जिल्हयांचे माेठे नुकसान होऊ लागले आहे.त्यामुळे मुख्यमंत्र्यानी अकोला कृषी विद्यापीठाचे विभाजन करतांना राजकीय दबावाला न बघता सर्वांगीण स्थळ ज्यांना चार पाचही जिल्ह्यासाठी सोयीचे ठरु शकेल अशा साकोलीची निवड केल्यास योग्य होईल अशी प्रतिक्रिया नागरीकांची येऊ लागली आहे.
विदर्भात अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे. विदर्भात कृषी संशोधन केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. अनेक जिल्ह्यांत नवीन कृषी महाविद्यालये स्थापन झाली आहेत. त्यामुळे पंदेकृ विद्यापीठावरील भार प्रचंड वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल, सिंदेवाही व गडचिरोली मुख्यालयात कृषी विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी जोर धरत आहे.मात्र हे ठिकाण मध्यवर्ती स्थळ नसून एका टोकाला पडत असल्याने इतर जिल्ह्यांना त्याचा फटका बसू शकतो यासाठी सरकारने साकोली या स्थळाचा विचार केल्यास चांगले कृषी विद्यापीठ पुर्व विदर्भात विशेष करुन मामा तलावांची संख्या अधिक असलेल्या भंडारा-गोंदिया जिल्ह्याला मिळू शकते यासाठी जनतेने पुढाकार घेण्याची गरज तर लोकप्रतिनिधींनी बााता मारण्यापेक्षा पाठपुराव्याची गरज ठरली आहे.