विद्युततारांच्या करंटने बैलाचा मृत्यू,विज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार

0
8

चिचगड,दि.२६(सुभाष सोनवणे)-देवरी तालुक्यातील चिचगड हे गाव मोठे गाव असून येथील मुख्यरस्त्याला लागून गेलेल्या विज वितरणवाहिनीच्या खांबावरील तार लोबंकळले आहेत.त्यातच लोंबकळलेले हे तार मुख्य विजतारांना लागून तार खाली पडल्याने त्या तारेच्या करंटने लक्ष्मण गावळ यांच्या सुमारे ३५-४० हजार रुपये किमतीच्या बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी(दि.२६)घडली.गावळ हे आपली बैलजोडी घेऊन तलावाच्या पाळीवरुन शेताकडे चारण्यासाठी जात असताना घटना घडली.गेल्या २०-३५ दिवसापासून तार लोंबकळत असल्याने धोका होऊ शकतो याची माहिती विज वितरण कंपनीला देण्यात आल्यानंतरही त्याकडे लक्ष दिले गेले नसल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.एमएसईबीच्या या गोंधळामुळे बैलाचा मृत्यू झाल्याने संबधित शेतकèयाला मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे.