कलपाथरी व कटंगी मध्यम प्रकल्प क्षेत्रातील जमीन खरेदी-विक्रीचे निर्बंध हटले

0
12

गोंदिया,दि.३१ : गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी आणि कटंगी मध्यम प्रकल्पाअंतर्गत बाधित/लाभ क्षेत्रातील जागांमधील जमीन संपादनाची आवश्यकता नसल्यामुळे यावर लावलेले खरेदी/विक्री व इतर तत्सम व्यवहारावरील निर्बंध एका अधिसूचनेद्वारे उठविण्यात आले आहे. कलपाथरी मध्यम प्रकल्पाअंतर्गत येणारी घुमर्रा, पलखेडा, सोनारटोला, मोकासीटोला, तेलंगखेडी, भगतटोला, मोहगाव, चांगोटोला, चोपा, बाजारटोला, कन्हारटोला, आकोटोला, तिल्ली, मोहाडी ही बाधित गावे व लाभ क्षेत्रातील मोहाडी, मुंढरीटोला, कवडीटोला, बबई, कमरगाव, म्हसगाव, देऊटोला, बोटे,दवडीपार, झांझीया आदी गावे तसेच कटंगी मध्यम प्रकल्पाअंतर्गत येणारी कटंगी/बुज., पिंडकेपार, पाथरी, हिरापूर व लाभ क्षेत्रातील कटंगी/बुज., गोरेगाव, हिरडामाली, तुमखेडा/बुज., घोटी, सिलेगाव, पुरगाव व गणखैरा या गावातील जमिनीवर लावलेले खरेदी-विक्रीचे व इतर तत्सम व्यवहारावरील लावलेले निर्बंध उठविण्यात आले आहे.