१ नोव्हेंबर रोजी राज्यस्तीय शालेय वुशू स्पर्धा

0
10

गोंदिया,दि.३१ : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा कार्यालय आणि ऑल गोंदिया जिल्हा वुशू संघटना यांच्या संयुक्त वतीने १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हा‍ क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय शालेय वुशू स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री राजकुमार बडोले हे स्पर्धेचे उदघाटन करतील. अध्यक्षस्थानी विधानमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल हे असतील. विशेष उपस्थिती म्हणून जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, खासदार सर्वश्री प्रफुल पटेल, नाना पटोले, अशोक नेते, आमदार सर्वश्री प्रा.अनिल सोले, डॉ.परिणय फुके, ना.गो.गाणार, विजय रहांगडाले, संजय पुराम, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे यांची तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, नागपूर विभागाचे क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर यांची उपस्थिती राहणार आहे.