31 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ आदिवासी विद्यार्थ्यांचे पैसे थेट खात्यात देवू नका – आ. पुराम

आदिवासी विद्यार्थ्यांचे पैसे थेट खात्यात देवू नका – आ. पुराम

0
27

देवरी,दि.०७-शासनाने विविध योजनेचा लाभ आदिवासी विद्यार्थ्यांना मिळण्याकरीता सदर योजनेचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे ठरविले होते आणि त्याप्रमाणे ते जमा होत आहेत. परंतु अनेक पालकांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या असून शासनातर्फे विद्यार्थ्यांच्या खात्यात देण्यात येणारे पैसे थांबविण्यात यावे व ही योजना पूर्वीप्रमाणेच राबविण्यात यावी अशी मागणी आमगाव-देवरी विधान सभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी केली आहे.
दरम्यान, यानिमीत्ताने आ. पुराम यांनी आदीवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याशी मुंबई येथे मंत्रालयात भेट घेवून त्यांना निवेदन सादर केले. सादर निवेदनानुसार शासनाने विविध योजनेचा लाभ आदिवासी विद्यार्थ्यांना मिळण्याकरीता सदर योजनेचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे ठरविले होते आणि त्याप्रमाणे ते जमा होत आहेत. परंतु अनेक पालकांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. ही योजना शासनाकडूनच योग्य रीत्या आणि चांगल्या रीतीने राबविण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना मिळणार्‍या योजना उच्च दर्जाच्या असाव्या आणि ह्या योजना शासनाकडूनच राबविण्यात याव्यात अशी पालकांची मागणी असून जुन्या पद्धतीप्रमाणेच ही योजना राबविण्याची विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.