31 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ राष्ट्रवादीच्या सदस्यता मोहिमेचा शुभारंभ

राष्ट्रवादीच्या सदस्यता मोहिमेचा शुभारंभ

0
28

गोंदिया,दि.०७- महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्राथमिक व क्रियाशील सदस्यता अभियानाला सुरुवात करण्यात आली असून गोंदिया जिल्ह्यातही मोठ्याप्रमाणात सदस्यता मोहिम हाती घेण्यासाठी सभासद नोंदणी कार्यक्रमाचा शुभारंभ माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले.रेलटोली स्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार दिलीप बनसोड,देवेद्रनांथ चौबे,अशोक सहारे,किशोर तरोणे,राजलक्ष्मी तुरकर,शिव शर्मा,पंचम बिसेन,जितेश टेंभरे,गणेश बरडे,केतन तुरकर,प्रेम रहागंडाले,मनोज डोंगरे,तुकाराम बोहरे,जिब्राईल पठाण,बंटी भाटिया,नामदेव डोंगरवार,भोजराज चुलपार,केवल बघेले,करण टेकाम,विनोद पाटील,पंकज पटले,सोनू येळे आदी उपस्थित होते.