28.4 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ नुकसानग्रस्तांना मदत देणार-माधव भंडारी

नुकसानग्रस्तांना मदत देणार-माधव भंडारी

0
27

गडचिरोली,दि.07 : यावषी पूर्व विदर्भातील धानाच्या जिल्ह्यात पावसाच्या कमतरतेमुळे मावा-तुडतुड्याचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात शेतकºयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू असून शेतकºयांना मदत देण्यासंदर्भात सरकार गांभीर्याने विचार करीत आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकारची कामगिरी सांगण्यासाठी भंडारी पूर्व विदर्भाच्या दौºयावर निघाले आहेत. त्यात सोमवारी सायंकाळी त्यांनी गडचिरोलीत पत्रकारांना माहिती दिली.
अनियमित आणि कमी पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कीटकनाशकाची फवारणी हा ठाम उपाय आता राहिलेला नाही. त्याऐवजी इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित प्रतिकीटकांचा वापर योग्य ठरणार आहे. प्रत्येक किडीला शत्रुकिड असते. त्यामुळे ती किडच उपद्रवी किडीला नष्ट करू शकते. त्यासाठी शास्त्रज्ञांकडून योग्य ती माहिती घेतली जात असून भारतातही हे तंत्रज्ञान विकसित करून किडीच्या प्रादुर्भावर उपायोजना तयार करणे सुरू असल्याचे भंडारी यांनी सांगितले. शेतीच्या क्षेत्रात मुलभूत बदल केल्याने शेतीत गुंतवणूक वाढली. जलयुक्त शिवार, शेततळे यामुळे शेतीच्या पाण्याचे विकेंद्रीकरण झालं. विहिरींच्या पाण्यावरील सिंचन क्षेत्र वाढलं. शेतकºयांना ३४ हजार २२ कोटी रुपयांची कर्जमाफी देताना शेतकºयांना कर्जमुक्त करून त्यांची पत वाढविणे, जेणेकरून त्यांना पुढील कर्ज उपलब्ध होण्यासाठी अडचण जाणार नाही, अशी व्यवस्था केली. आधीच्या आणि आताच्या कर्जमाफीत हा मुख्य फरक असल्याचे त्यांनी सांगितले.
या कर्जमाफीसाठी निकषात बसत असलेल्या परंतू विविध कारणांनी वंचित राहिलेल्या शेतकºयांचा फेरआढावा घेण्यासाठी तालुकास्तरावर सहायक निबंधकांच्या नेतृत्वात समित्यांचे गठन करून छाननी केली जाणार असल्याचे यावेळी भंडारी यांनी सांगितले.या पत्रपरिषदेला खा.अशोक नेते, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, माजी जि.प.अध्यक्ष रवींद्र ओलालवार, विदर्भ विभाग प्रसिद्धी प्रमुख चंदन गोस्वामी, रमेश भुसारी, डॉ.भारत खटी, अनिल कुनघाडकर, आनंद श्रृंगारपवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.