26.9 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ जि.प.पं.स.सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी एस.एस.बुध्दे

जि.प.पं.स.सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी एस.एस.बुध्दे

0
38

गोंदिया,दि.०७-गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.गोंदियाच्या अध्यक्षांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर नव्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी मंगळवारला झालेल्या सभेत दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले.त्यामध्ये एस.एस.बुध्दे यांना सर्वाधिक मते मिळाल्याने अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याची घोषणा निवडणुक निर्णय अधिकाèयानी केली.अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीच्यावेळी एस.एस.बुध्दे यांचे नाव डी.एम.खोटेले यांनी सुचविले त्यास गुणवंत ठाकूर यांनी अनुमोदन दिले.तर श्रीधर आदमने यांचे नाव नरेंद्र अतकरी यांनी सुचविले त्यास दयानंद फqटग यांनी अनुमोदन दिले.त्यामुळे गुप्त पध्दतीने निवडणुक घेण्यात आली.यामध्ये बुध्दे यांना २१ पैकी १५ तर आदमने यांना ६ मते पडल्याने निवडणुक अधिकारी एल.डी.शहारे यांनी बुध्दे यांनी विजयी घोषीत केले.बुध्दे यांचे सचिवांसह सर्व संचालक मंडळ व कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.