26.9 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home शैक्षणिक मोहगाव शाळेत विद्यार्थी दिवस उत्साहात

मोहगाव शाळेत विद्यार्थी दिवस उत्साहात

0
30

गोरेगाव,दि.०७ः- तालुक्यातील परशुराम विद्यालय मोहगांव बु.येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील पहिला दिवस ‘विद्यार्थी दिवसङ्क रुपात उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात सर्वप्रथम भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.मुख्याध्यापक कटरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर आधारित सविस्तर माहिती विद्याथ्र्यांना देत,बाबासाहेबांचे विचार अंगीकृत करण्याचे आवाहन केले.यावेळी शाळेतील सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन डी.डी.चौरागडे यांनी केले.यावेळी विद्याथ्र्यांसाठी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर निबंध स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते.