बीआरएसपीचे आरोग्य विषयक समस्यांना घेऊन ‘मूंडण’ आंदोलन

0
16

गडचिरोली,दि. ९ : जिल्ह्यातील आरोग्याच्या समस्यांना घेऊन बहूजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतर्फे  आज गुरुवारला येथील जिल्हा रुग्णालयासमोर मुंडण आंदोलन करण्यात आले.तसेच आरोग्य विषयक प्रलंबित समस्या त्वरीत न सोडविल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. कित्येक महिन्यांपासून सिटी स्कॅलन मशीन बंद पडली आहे. डाॅक्टरांचा अभाव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रुळे यांची सततची अनुपस्थिती, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी इंदिरा गांधी चौकात महिला व बाल रुग्णालय इमारत असून २ वर्षापासून केवळ शोभेची वास्तु ठरली आहे. कर्मचार्यांना काम न करता वेतन देण्यात येत आहे, अशा अनेक समस्यांनी आरोग्य विभागग्रस्त असल्याने सदर समस्या त्वरीत सोडविण्यात याव्यात या मागणीला घेवून बहूजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने मुंडण आंदोलन करीत  जिल्हा शल्य चिकित्सकांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदन सादर करतांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणजी नागदेवते, गडचिरोली विधानसभा प्रभारी पुरुषोत्तम रामटेके, जिल्हासचिव सदाशिव निमगडे, तालुकाध्यक्ष विवेकजी बारसिंगे आदींसह बहूजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे बहूसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.