गोरेगाव,आमगावमध्ये तहसिलदारांना ओबीसी संघर्ष कृती समितीचे निवेदन

0
26
आमगाव/गोरेगाव,दि.10-गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने सर्व तालुकास्थळी आज गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्याच्या मागणीसह पिकविम्याद्वारे शेतकèयांची झालेली फसवणूक थांबवून पिक विम्याचे नियम बदलविणे,ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू लागल्याने शिष्यवृत्तीसाठीची जुनीच प्रकिया राबविणे,नान क्रिमिलेयरच्या उत्पन्न वाढीचा शासन निर्णय काढण्यासह इतर मागण्यांचे निवेदन आमगाव व गोरेगाव येथे संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसिलदारांना देण्यात आले.
IMG-20171110-WA0008आमगाव येथे तालुका ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी सेवा संघाच्यावतीने तहसिलदारांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात संपूर्ण गोंदिया जिल्हा दुष्काळ ग्रस्त घोषित करणे,पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची, शासनातर्फे होत असलेली फसवणूक बंद करून निकष बदलविण्यात यावे.मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बंद केलेली शिष्यवृत्ती त्वरित सुरु करण्याची मागणी करण्यात यावी या मागणीचा समावेश होता. आमगाव येथे निवेदन देतेवेळी संघर्ष कृती समितीचे आमगाव तालुका अध्यक्ष लीलाधर गिर्हेपुंजे,कार्याध्यक्ष नरेंद्र शिवणकर,ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष हरिष ब्राह्मणकर,तीलकचंद बिसेन,रमेश चोरवडे,खुमेश्वर शेंडे,राजेश रहांगडाले,ओम ठाकरे, प्रशांत गायधने, कृष्णा बाहेकर व समस्त पदाधिकारी होते.
त्याचप्रमाणे गोरेगाव येथे तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांना निवेदन सादर करण्यात आले. गोरेगाव येथे निवेदन देतेवेळी ओबीसी संघर्ष कृती समिती तालुकाध्यक्ष दिलीप चव्हाण,शहर अध्यक्ष गुड्डू कटरे,चौकलाल येळे,शामकुमार फाये,प्रविण पटले,संजु भगत,राज बोम्बार्डे,कमलेश ठाकूर,राजू कटरे,अनुराग सरोजकर,अशोक नागोसे आदी  उपस्थित होते.