ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार

0
10

अाल्लापली,दि.१०: सुरजागड पहाडावरुन लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने जबर धडक दिल्याने लुनास्वार इसम जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारनंतर साडेचार वाजताच्या सुमारास महागाव-आलापल्ली-आपापल्ली-सुभाषनगर चौरस्त्यावर घडली. इरमसाय कमलसाय मडावी(५०)रा.इतलचेरु असे मृत इसमाचे नाव आहे.एमएच ३४ एव्ही १३३५ क्रमांकाचा ट्रक सुरजागड पहाडावरुन लोहखनिज घेऊन जात असताना महागाव-आलापल्ली-आपापल्ली-सुभाषनगर चौरस्त्यावर  ट्रकचा टायर अचानक फुटला. त्यानंतर या ट्रकने बोरी येथून इतलचेरुकडे जात असलेल्या एमएच ३३ पी ९६९० क्रमांकाच्या लुनास जबर धड‍क दिली. या अपघातात लुनास्वार इरमसाय मडावी जागीच ठार झाला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला. अहेरी पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. पोलिस निरीक्षक सुरेश मदने घटनेचा तपास करीत आहेत.