गोंड गोवारी ‘अशी सलग जात नाही, गोवारी हीच मुळ आदिवासी जमात होय : क्रिष्णा शेरू सर्पा 

0
111
प्रतिनिधी/१० नोव्हेंबर
गोंदिया :  अनूसूचित जमातीमध्ये समाविष्ट असलेल्या गोंड गोवारी ही सलग जात नसुन वास्तविक पाहता गोंड  व गोवारी तत्सम वेगवेगळ्या जमाती आहेत. गोंड गोवारी ही कपोलकल्पित जमात  प्रशासनाच्या चुकीमुळे निर्माण झालेली जमात असल्याचा दावा आदिवासी गोवारी संघर्ष कृती समिती गोंडवानाच्या वतीने  दिलेल्या निवेदनातून समितीचे अध्यक्ष कृष्णा सर्पा यांनी केला आहे. समाजाची दिशाभूल करण्यासाठी गोवारी  गोवारी मध्ये पुâट पाडण्यात येत असून ही बाब गरिब आदिवासी गोवारी समाजासाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे गोवारी  गोवारी यातील फरक दूर करून गोवारी जमातीलाच अनुसूचित जमातीच्या तरतूदी लागु कराव्यात , अशी मागणीही दिलेल्या निवेदनातून आदिवासी गोवारी संघर्ष कृती समिती गोंडवानाच्या वतीने करण्यात आली आहे.
देशात सन १९३१ मध्ये पहिली जातनिहाय जनजगणना करण्यात आली. त्यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गात गोवारी समाजाचा समावेश होता. १९४८ च्या सी.पी. अ‍ॅड बेरार लोकल गव्हर्मेट अ‍ॅक्ट मध्ये सुद्धा गोवारी अशीच नोंद आहे. तत्कालीन आमदार क्रांतीवीर नारायण सिंह ऊईके यांनी १९५३ व १९५५ ला गोवारी अशीच मागणी केली होती.
 त्यानंतर १९५३ च्या काका कालेलकर  मागास वर्गीय आयोगाच्या शिफारशीतही गोवारी  जमात  अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट असल्याची शिफारस होती. परंतु १९५६ मध्ये संसदेच्या चुकीमुळे गोवारी जमाती ऐवजी  गोंड गोवारी असे नामांतरण झाले.  शासनाच्या चुकीमुळे गोवारी समाजाचे तुकडे पडले आहेत. राजकारणाचा लाभ घेण्यासाठी काही राजकीय मंडळी सुध्दा अलिकडे समाजाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आदिवासी गोवारी संघर्ष कृती समिती गोंडवानाच्या वतीने एका निवेदनातून करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यासह इतर भागात गोंड गोवारी अशा (१९५० पुर्वीच्या) जातीच्या नोंदी किंवा अभिलेख उपलब्ध नाही. गोवारी किंवा गोवारा अशाच जातीच्या नोंदी किंवा अभिलेख असलेल्या तसेच गोंडासारखी आडनावे आहेत. म्हणून ते गोंड गोवारी आहेत, असे तर्काने जात ठरविण्याचा प्रकार आहे. आणि तसा अहवाल सुद्धा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे मुळ आदिवासी गोवारी जमातीच्या गरिब लोकांवर घोर अन्याय होत आहे. व गोंड गोवारी ही कपोलकल्पित जमात असल्याचा दावा करण्यात येत  आहे.
गोवारी  गोवारी यातील फरक दूर करून अनुसूचित जमातीच्या सोयी सवलतीची तरतूद करून गोवारी जमातीला  न्याय द्यावा, अशी मागणीकरित अलिकडेच काही वर्तमानपत्रातुन गोवारी गोवारी मध्ये भेद करणाNया उलट सुलट बातम्या आलेल्या आहेत या पाश्र्वभूमीवर  क्रिष्णा सर्पा यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे .