चुलबंदनदी घाटावर महसुल विभागाची धाड,ट्रक्टर जप्त

0
16

सडक अर्जुनी,दि.16(विशेष प्रतिनिधी)- तालुक्यातील सौंदड नजीकच्या चुलबंद नदीवरील पिपरी घाट बुडीत पुलाजवळील जागेतून अवैधरित्या वाळुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच महसुल विभागाच्या अधिकार्यानी धाड घालून ट्रक्टरसह वाहनचालकांना ताब्यात घेऊन ९२ हजार ४०० रुपयाचा दंड आज १६ नोव्हेंबर रोजी वसुल केला. महसुल विभागाच्या पथकाने धाड घातली तेव्हा ७ ट्रक्टर अवैधरित्या वाळु वाहून नेतांना पकडले.त्यापैकी एका वाहनचालकाने टॅक्टर घटना स्थळावर सोडून पसार झाला.पकडण्यात आलेल्या ट्रक्टरमध्ये एम.एच.३५ एफ.२३६१,एम.एच.३५ जी.६७७७,नवीन जॉनडीयर ट्रक्टर,एम.एच.३५ जी.४३१३,एम.एच.३५.जी.३४५४, व नविन महिंद्रा ट्रैक्टरचा समावेश असून एक ट्रक्टरवगळता सर्व ट्रक्टर हे सौंदड येथील आहेत.प्रत्येकी वाहन १५४०० रुपये प्रमाणे दंड आकारुन दंडाची रक्कम शासकीय खजीन्यात जमा करण्यात आली.ही कारवाई नायब तहसिलदार अखिलभारत मेश्राम यांनी पहाटे ६.३० वाजता केली.त्यांच्यासोबत कोकणा येथील तलाठी बी.बी.नंदागवळी व दोन पोलीस कर्मचारी होते.