28.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ साकोलीत कृषी विद्यापीठाची मागणी-आ.फुकेंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

साकोलीत कृषी विद्यापीठाची मागणी-आ.फुकेंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
32

बेरार टाईम्सने सातत्याने प्रकाशित केले होते वृत्त

गोंदिया,दि.18 : अकोला येथील डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे विभाजन करुन कृषी विद्यापीठ साकोली येथे स्थापन करण्याची मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.विशेष म्हणजे एकमेव बेरार टाईम्सवृत्तपत्र व न्युजपोर्टलने सातत्याने साकोली हे स्थळ कृषी विद्यापीठासाठी मध्यवर्ती स्थळ असल्याबाबत शासनाचे लक्ष याकडे वेधले होते.त्यासंबधी पुर्व विदर्भातील मध्यवर्तीस्थळ साकोलीत द्या नवे कृषी विद्यापीठ  या मथळ्याखाली 26 आॅक्टोंबरला वृत्तही प्रकाशित केले होते.त्यानंतर आमदार फुके यांनी घेतलेली दखल भविष्यात साकोलीला कृषी विद्यापीठ मिळवून देण्यासाठी नक्कीच महत्वाची राहणार असल्याने बेरार टाईम्सने आ.फुके यांचे पुढाकार घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
भंडारा मतदार संघातील साकोली हे स्थान पूर्व विदर्भातील मध्यवर्ती स्थान असून गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर नागपूर जिल्ह्यानाही फार जवळचे आहे. साकोली येथे डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विद्यापीठ केंद्र सुध्दा उपलब्ध आहे. तसेच कृषी विभागाचे प्रशिक्षण अभ्यास केंद्र व जवळच मत्स्य बिज केंद्र तसेच गोंदिया- भंडारा येथे मासे तलाव असल्याने मतदार संघातील ज्येष्ठ व तज्ञ नागरिकांनी केलेल्या वारंवार मागणीमुळे परिस्थितीचा अभ्यास केला असता पूर्व विभागातील पाचही जिल्ह्याना सोईचे होईल असे साकोली या तालुक्याच्या ठिकाणी नवे कृषी विद्यापिठ स्थापन करुन देण्याची मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी यांनी केली आहे.