क्रिमीलेअरची अट रद्द करा-कलार समाजाची मागणी

0
10

गोंदियाŸदि.२६: संपूर्ण ओबीसी समाजाला लावलेली क्रिमीलेअरची अट रद्द करण्यात यावी, कलार समाजाला यथोचित आारक्षणाचा लाभ द्यावा तसेच ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी, अशा आशयाचे निवेदन कोसरे कलार समाज संस्थेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकाèयांमार्फत पाठविण्यात आले.
कोसरे कलार समाजासह अन्य वर्गीय कलार समाजसुद्धा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय दृष्टीकोनातून मागासलेला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या यादीत ईतर मागासवर्गीय या प्रवर्गात कलार जात असल्याने या समाजासह संपूर्ण ओबीसी समाजाच्या क्रिमीलेअरची अट लागू आहे जी पूर्णत: असंवैधानिक आहे.
सदर अटीमुळे कलार समाजासह संपूर्ण ओबीसी समाजाला शैक्षणिक विकासात अडथडा निर्माण होत असून समाजातील मुलांवर उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. कलार समाजासह समस्त ओबीसी समाजासह अन्य प्रवर्गासाठी लागू असलेली ही असंवैधानिक क्रिमीलेअरची अट शासनस्तरावरुन रद्द करण्याची कार्यवाही करावी. कलार समाजाच्या शैक्षणिक विकासात हातभार लावावा. अती मागास कलार समाजाला यथोचित आरक्षणाचा लाभ व विशेष सवलती प्रदान करण्यात याव्या. तसेच कलार समाजासह संपूर्ण ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी आदी अनेक मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देतेवेळी संस्थापक जिल्हाध्यक्ष तिर्थराज उके, जिल्हा सहसचिव उमेश आसाराम सहारे, जिल्हा कोषाध्यक्ष दिनेश हिरालाल फरकुंडे आदी कोसरे कलार समाज संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.