सिरोंचा तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ; ना.राजे अम्ब्रिशराव आत्राम

0
17

आलापल्ली,दि.26: सिरोंचा तालुक्यातील प्रत्येक खेड्यातील विकास करण्यासाठी मी कटीबद्द असून या तालुक्याच्या विकास साठी निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी बोरमपल्ली येत आयोजित सभेत केले सिरोंचा तालुक्यातील ३० कोटीच्या विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी पालकमंत्री म्हणाले कि, सिरोंचा तालुक्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या विकासासाठी मी कटीबद्द असून गत वर्षी १८० कोटी निधी शासनाकडून आणण्यात मला यश आले असून पुढल्या वर्षी ३०० कोटी पेक्षा अधिक निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. सिरोंचात तालुक्यातील बोरमपल्ली ते मोयाबिनपेटा सुमारे २२ किमी अंतरच्या रास्ता खळीकरण व डांबरीकरणासाठी सुमारे १९ कोटी ५० लक्ष व बोरंमपल्ली येथील पोच्चम्मा येते सभा मंडप, टेकडा येथे समाज मंदिर ८ लक्ष व पसरली ते कोप्पेला १२ कोटी रुपयांची एकूण ३२ कोटी रुपयांचा भूमिपूजन नुकताच जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांच्या हस्ते फार पडले.
या तालुक्यात स्वतंत्राच्या ७० वर्षांनंतर जे विकास कामे पूर्ण झाले नाही ते आज मी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि या आदींचे मंत्रांनी व आमदारांनी केले नाही म्हणून आज मला ते करावा लागत आहे. कथाकथित राजकारणाला बळी पडू नये असे आवाहन पालकमंत्रीनी केले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक संदीप राचर्लावार ,नाविस चे उपाध्यक्ष संतोष पडालवार नगर अध्यक्ष राजू पेद्दापल्ली,तालुका महामंत्री तथा अंकिसाचे तंठामुक्ती अध्यक्ष श्रीनाथ राऊत,शहर महामंत्री दिलीप सनिगारापू रवी चाकीनारापू,तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संतोष अटला,पाणीपुरवठा सभापती विजय तोकाला, पंचायत समिती सदस्य जपमन्ना दुर्गम, स्वामी मासर्ला बाबर शेख, रामन्ना कडार्ला, सुरेश पद्मागिरीवार,जंहेंद्र श्रीपती,निलेश गाग्गुरी अशोक पेंद्दी, राजेशम काशेट्टी, मल्लांना संगर्ती,राजबापू पोलमपल्ली व आदी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व जनसमूह उपस्थित होते.