28.3 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ राष्ट्रवादी काँग्रेसची सभा आज सोमवारला

राष्ट्रवादी काँग्रेसची सभा आज सोमवारला

0
20
गोंदिया,दि.27ः-  गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने आज सोमवारला दुपारी 12 वाजता येथील रेलटोली स्थित कार्यालयात जिल्हास्तरीय सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेत महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणीने सरकारच्या विरोधात यवतमाळ येथून सुरु करण्यात येत असलेल्या हल्लाबोल आंदोलनासंदर्भात जिल्हास्तरीय आढावा सभा घेण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार शेतकरी कर्जमुक्ती,बेरोजगारी,वाढलेले विजेचे दर,ओबीसी शिष्यवृत्ती आदी मुद्यांना घेऊन 1 डिसेंबर पासून यवतमाळ येथून खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वात हल्लाबोल दिंडी काढण्यात येणार आहे.त्या दिंडीचा समारोप नागपूर येथे 12 डिसेंबरला होणार आहे.त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज गोंदियात राष्ट्रवादी काँग्रेसने सभेचे आयोजन केले आहे.या सभेला  माजी आमदार राजेन्द्र जैन, माजी आमदार  दिलीप बंसोड, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवनकर, जि.प. गट नेता गंगाधर परशुरामकर,महिलाअध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर,प्रभाकर दोनोडे,मनोहरराव चंद्रिकापुरे सह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ता उपस्थित राहणार अाहेत.या सभेला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांनी केले आहे.