गडचिरोलीत जिल्हा माळी समाज, सामाजिक संघटनेतर्फे आज शिक्षक दिन

0
19

गडचिरोली,दि.28ः- येथील जिल्हा माळी समाज संघटना व जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटनांच्यावतीने उद्या २८ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथील अभिनव लॉनमध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मृतिनिदनानिमित्त शिक्षक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज १७ नोव्हेंबर रोजी प्रेसक्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत माळी समाज संघटना व सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी दिली.
पत्रकार परिषदेला संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम निकोडे, उपाध्यक्ष पुरण पेटकुले, अशोक मांदाडे, चेतन शेंडे, दत्तु चौधरी, निलकंठ निकुरे, रूचित वांढरे, बाळू टेंभुर्णे, सुरेश डाईजड, भुजंगराव पात्रीकर उपस्थित होते.
सकाळी १0 वाजता फुले वॉर्डातून समाज जागृती महारॅली काढण्यात येईल. त्यानंतर साडेअकरा वाजता कार्यक्रमाचे उद््घाटन होईल. कार्यक्रमाचे उद््घाटन अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव लिंगे यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी माळी समाज सेवा संघाचे संस्थापक दिलीप कोटरंगे राहतील. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संभाजी ब्रिगेडचे संघटक अमोल मिटकरी, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे राहती. विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक बबनराव तायवाडे, स्वातगताध्यक्ष म्हणून जिल्हा माळी समाज संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम निकोडे, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. हरिराम वरखडे, दादाजी चापले, डॉ. शिवनाथ कुंभारे, प्रा. शेषराव येलेकर, अरूण पा. मुनघाटे, रोहिदास राऊत, अँड. राम मेर्शाम, विजय गोरडवार, हाजी हबीबखॉ पठाण, नामदेव शेंडे, रमेश मडावी, विजय बन्सोड, उद्धव डांगे, विलास निंबोरकर, धनपाल मिसार, डॉ. कैलास नगराळे, केशव सामृतवार, प्रभाकर गव्हारे, गौतम मेर्शाम, गुरूदेव भोपये, प्रा. प्रकाश दुधे, मारोती दुधबावरे, हिरामण वरखडे, धर्मानंद मेर्शाम, वसंत कुलसंगे, समशेर पठाण, डोमाजी डोंगरे, रूचित वांढरे आदी मान्यवर उपस्थित राहतीलअशी माहिती पत्रकार परिषदेतून दिली. कार्यक्रमास उपस्थित राहणाचे आवाहन आयोजकांनी केले आहे.