24 लाखाचा रिसाळा नाल्यावरील बंधारा पांढरा हत्ती

0
7

तिरोडा,दि.28 : तिरोडा तालुक्यातील नवेझरी मार्गावरील रिसाळा नाल्यावर २४ लाख रुपये खर्चून बंधारा तयार करण्यात आला. मात्र बंधाºयाच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. परिणामी हा बंधारा शेतकऱ्यांसाठी पांढरा हत्ती ठरला आहे.नवेझरी-लोणारा मार्गावरील नाल्यावर रिसाळा तलावाच्या खोºयातून जाणाºया नाल्यावर लघुसिंचन जलसंधारण उपविभागाअंतर्गत नवेझरी येथे २४ लाख ७७ हजार ७३९ रुपये खर्च करुन कोल्हापूरी बंधारा तयार करण्यात आला. मात्र या बंधाऱ्यात सध्या स्थितीत एकही थेंब पाणी नाही.विशेष म्हणजे या विभागाच्या कार्यकारी अभियंत्यापासून उपअभियंत्यानी सुध्दायाकडे लक्ष न दिल्याने शेती पाण्यापासून वंचित राहिली आहे.या बंधाºयात पाणी साचले असते तर ५० एकर शेती ओलीताखाली आली असती. मात्र या विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे एक एकर शेतीला सिंचन होत नसल्याचे चित्र आहे. शासनतर्फे शेतकºयांसाठी नाल्यावर बंधारे तयार केले जाते. पण कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकाºयांमुळे हे बंधारे शेतकºयांसाठी केवळ पांढरा हत्ती ठरत आहे.
बंधाºयाला भेगा पडल्या असून त्यातून पाणी पाझरते. याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते महेंद्र भांडारकर यांनी सहायक अभियंता सोनिया जाधव, कार्यकारी अभियंता पी. वी. देवगडे यांना लेखी व तोंडी तक्रार केली. मात्र अधिकाºयांनी त्याला केराची टोपली दाखवित दुर्लक्ष केले.लघू सिंचन व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुध्दा याकडे दुर्लक्ष केले आहे. २४ लाख रुपये खर्च करुन देखील बंधाऱ्यांला भेगा पडल्या आहेत. बंधाºयाच्या शेवटच्या टोकावर उजव्या बाजूला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. बंधाºयाचा शेतकºयांना कुठलाच उपयोग होत नाही.