कवेलूच्या घरांना दाखविले स्लॅबचे घर

0
25

सडक अर्जुनी,दि.२९-: केंद्र आणि राज्य सरकारतर्फे २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचा संकल्प केला जात आहे. तर दुसरीकडे मात्र प्रशासकीय यंत्रणेमुळे गरजू लाभाथ्र्यांना योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे कवेलूंच्या घरांना चक्क स्लॅबची घरे दाखविल्याचा प्रकार सडक-अर्जुनी तालुक्यात उघडकीस आली आहे.
सडक-अर्जुनी तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेच्या अधिकाèयांनी कोदामेडी/केसलवाडा ग्रामपंचायतीतील कवेलूंच्या घरांना स्लॅबचे घर दाखवून गरजू लाभाथ्र्यांना वंचित ठेवल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य निशांत राऊत यांनी केला आहे. तसेच यासंबंधीची लेखी तक्रार सुद्धा त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकरे यांच्याकडे केली आहे.
प्रत्यक्ष अधिकाèयांनी मोक्यावर जाऊन चौकशी केली. ज्यांचे घर जसे आढळले तसे अहवालात नमूद करण्यात आले. परंतु अधिकाèयांनी ज्यांचे घर हे स्लॅबचे दाखविले त्यांची घरे आजही कवेलूंची आहे. काही लोकांच्या नावावर घर नसून देखील त्यांचे घर देखील स्लॅबचे दाखविण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. मौका चौकशी झालीच नाही तर त्यंनी कोणत्या आधारावर अहवाल सादर केला. असा प्रशन उपस्थित केला जात आहे. या अहवालावर नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, अभियंता अशा चार जवाबदार अधिकाèयांच्या स्वाक्षèया आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गरजू लाभार्थीॅ याचा जाब विचारण्यासाठी पंचायत समितीच्या चकरा मारत असल्याचे बोलल्या याते. मात्र पंचायत समिती स्तरावर याबााबत कुठलेही पाऊले उचलण्यात आली नसल्याची माहिती आहे.
अधिकाèयांच्या चुकीच्या अहवालामुळे कोदामेडी व केसलवाडा लाभाथ्र्यांना योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित रहावे लागत आहे. या सर्व प्रकारात ग्रा.पं.च्या पदाधिकाèयांचा दोष नसून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. कोदामेडी/केसलवाडा या ग्रामपंचायतंर्गत बांधकाम करण्यात आलेल्या घरकूल आवास योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी आहे.