आ.फुकेच्या प्रयत्नाने श्रीकृष्ण गौरक्षण समितीला एक कोटी मंजूर

0
11

गोंदिया,दि.२९-भंडारा गोंदिया विधानपरिषद मतदारसंघाचे आमदार डॉ.परिणय फुके यांच्याप्रयत्नाने राज्यसरकारच्या दुग्धविकास व पशुसंवर्धन योजनेतंर्गत गोंदियातील श्रीकृष्ण गौरक्षण समितीला १ कोटी रुपयाचा निधी विकास कामासाठी मंजूर झाला आहे.
हा निधी मंजूर करुन दिल्याबद्दल समितीच्यावतीने पालिकेचे उपाध्यक्ष शिव शर्मा,सचिव राजेश व्यास,अरुण माहेश्वरी,स्नेहल पटेल यांनी डॉ.फुकेंचे अभिनंदन केले आहे.आमदार फुके यांनी आपल्या गोंदिया भेटीदरम्यान गौशाळेला भेट देऊन पाहणी केली असता समितीच्यावतीने करण्यात येत असलेल्या कामाची दखल घेत शासकीय योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.त्यांनुसार पशुसंवर्धन विभागाच्या मंत्रालयातील अधिकाèयांशी चर्चा करुन त्यांनी हा निधी मंजूर करुन दिला आहे.