देवरी,दि.१-प्रत्येक ग्रामसभेत ग्रामसेवक माहिती देण्यास टाळाटाळ करून जनतेची दिशाभूल करून कर्तव्यात कसूर करीत असल्याच्या रोष व्यक्त करीत संतप्त डवकीवासीयांनी गुरुवारी (ता.३0) ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. दरम्यान, आपल्या मागण्याचे निवेदन खंडविकास अधिकार्यांना सादर केले.
डवकी ग्रामपंचायतीची तहकूब आमसभा ३0 नोव्हेंबर रोजी घेणे अपेक्षित होते. परंतु, याबाबद ग्रामसेवकाने गावात दवंडी किंवा ग्रामपंचायत कार्यालयात सूचना जाहीर करण्यात आली नाही. यापूर्वी देखील १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला आयोजित ग्रामसभेबाबत ग्रामसेवकाने ग्रामविकास, शासनाच्या योजना आदींची माहिती न देताच वेळकाढूपणा करून नागरिकांची अशीच दिशाभूल केली होती. यासंदर्भात संबंधित विभागाला तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने, तसेच आज (ता.३0) तहकूब ग्रामसभा वेळेवर घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त डवकीवासीयांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.
दरम्यान, आपल्या मागण्याचे निवेदन खंडविकास अधिकार्यांना सादर केले. यावेळी गणेशराम राऊत, भोलाराम बावने, धर्मराज औरासे, दामोदर बावनकर, बळीराम पाटील, नरेश फुंडे, तुकाराम औरासे, गजानन फुंडे, अतिराम औरासे, लक्ष्मण नाईक, वसंत वलथरे, बाबुराव फुंड, चंद्रकिशोर लांजेवार, ईश्वरदास राऊत, राजकुमार चव्हाण, रामेश्वर नाईक, रमेश बावने, अकबर सय्यद आदी उपस्थित होते.नरेश माहेश्वरी हे नगरपरिषदेचे सर्मथन करताना आणि दुसरीकडे त्यांचे वरिष्ठ नेते महादेवराव शिवणकर, विजय शिवणकर, तिरथ येटरे, सुकराम फुंडे, मिर्शा यांनी नगरपरिषदेच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपरिषद संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी असा जनतेमध्ये सूर आहे





