26.3 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home विदर्भ ग्रामसेवक तुरकर निलंबित

ग्रामसेवक तुरकर निलंबित

0
36

अर्जुनी मोरगाव,दि.6 : पिंपळगाव (खांबी) ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक के.टी. तुरकर यांनी ३0 नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एच. ठाकरे यांनी निलंबित केले आहे. पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत पिंपळगाव (खांबी) येथील तत्कालीन ग्रामसेवक के.टी. तुरकर यांनी विकास कामांतर्गत एल. ई. डी. खरेदीमध्ये अपहार करणे याबाबत ग्रामसेवक पदाचे कार्य नियमबाह्य व बेजबाबदारपणे केले असून गैरप्रकारे केल्यामुळे महाराष्ट्र जि. प. जि. सेवा शिस्त व अपील नियम १९६४ व वर्तणूक नियम १९६७ चे नियम ३ चा भंग केल्यामुळे शिस्त भंगाच्या कार्यवाहीत पात्र ठरतात. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एच. ठाकरे यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून पिंपळगाव ग्रा. पं. चे तत्कालीन ग्रामसेवक के. टी. तुरकर यांना तात्काळ निलंबित केले आहे.