26.3 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हाधिकाºयांन निवेदन 

गोंदिया जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हाधिकाºयांन निवेदन 

0
38

गोंदिया,दि.6 : स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ झालेच पाहिजे, या प्रमुख मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी वृत्तपत्र विक्रेता संघटनांकडून जोरदार निदर्शने आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. गोंदिया येथेसुद्धा गोंदिया जिल्हा वृत्तपत्र संघटनेच्या विक्रेत्यांनी जोरदार निदर्शन आंदोलन केले. आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात राज्य संघटनेचे दिनेश उके तसेच गोंदिया जिल्हा वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष प्रमोद भोयर, उपाध्यक्ष राजेश साठवणे, सचिव हर्षदीप उके, दुर्गाप्रसाद अग्रहरी, वासुदेव देशमुख, राजेश वैद्य, विजय डोंगरे, भास्कर कडव, किशोर जैस्वाल, संतोष कोठेवार, राजू द्वारे, निहाल शेख, राजेश कडव, दत्ता गजभिये, नाना भौतमांगे, कृष्णा देशमुख, विक्की देशमुख, हेमंत हलमारे, महेश तरोणे, हरजित वाढई आदी उपस्थित होते.