पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण जाहीर

0
9

भंडारा,दि.09ः- जिल्हयातील ७ पंचायत समिती सभापती पदासाठी आज जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही सोडत काढण्यात आली.
जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोकर व निवासी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे यांची उपस्थिती होती. जीएनटी कॉन्हेंट शाळेची विद्यार्थींनी टिशिका सुरेश गोखले या विद्यार्थींनीच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली. तुमसर पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जाती महिलासाठी राखीव, भंडारा पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी राखीव, लाखनी नागरिकांचा मागास प्रवर्ग, मोहाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव, पवनी सर्वसाधारण आणि साकोली व लाखांदूर सर्वसाधारण महिलासाठी सभापतीपद राखीव असणार आहे. या सोडतीला विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.